नवी दिल्लीतल्या हवाई दलाच्या स्टेशनवरून हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग यांनी आज शौर्य भारत कार रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. “ऑपरेशन सिंदूर” चं स्मरण आणि आपल्या सुरक्षा दलांच्या शौर्याचा सन्मान करणं, हा या कार रॅलीचा उद्देश आहे. ही रॅली हवाईदल स्टेशन अंबाला मार्गे हवाईदल स्टेशन आदमपूर इथं जाणार आहे आणि रविवारी या रॅलीचा समारोप होणार आहे. या रॅलीमध्ये भारतीय तटरक्षक दल, डीआरडीओ आणि एनसीसी या तिन्ही दलांमधले एकूण ११२ सैनिक सहभागी झाले आहेत. ही रॅली महाविद्यालये आणि विद्यापीठांना भेट देऊन तिथल्या तरुणांशी संवाद साधणार आहे.
Site Admin | July 25, 2025 9:08 PM | Operation Sindooor
ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे स्मरण करण्यासाठी शौर्य भारत कार रॅलीला हिरवा झेंडा दाखवला
