डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची निवड आज करण्यात आली. आता ते जयंत पाटील यांची जागा घेतील. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर महत्त्वाच्या नेत्यांची मुंबईत बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. अनिल देशमुख यांनी शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शरद पवार आणि मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा