कॅनडातील विनीपेग इथं झालेल्या युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील शर्वरी शेंडे हिनं काल १८ वर्षांखालील मुलींच्या गटात सुवर्ण पदक पटकावलं. या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारी शर्वरी ही दुसरी भारतीय महिला स्पर्धक ठरली आहे.
या आधी शनिवारी चिकिता तनीपार्थी हिनं २१ वर्षांखालील गटात सुवर्ण पदक मिळवलं होतं. अटीतटीच्या सामन्यात शर्वरीनं आपल्या किम येवोन या दक्षिण कोरियाच्या प्रतिस्पर्ध्यावर ६-५ अशी मात केली. या स्पर्धेत प्रितिका प्रदीप हिने दोन रौप्य पदकं, तर गाथा खडके आणि शर्वरी शेंडे यांनी कास्य पदक पटकावलं आहे.