डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

January 13, 2025 8:55 PM | Sensex

printer

देशातल्या दोन्ही शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण

गेल्या आठवड्यापासून देशातल्या शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आजही कायम होती. जागतिक आणि स्थानिक कारणांमुळं देशातले दोन्ही शेअर बाजार घसरले. दिवसअखेर सेन्सेक्स १ हजार ४९ अंकांनी कोसळून ७६ हजार ३३० अंकांवर बंद झाला. निफ्टी ३४६ अंकांनी घसरला आणि २३ हजार ८६ अंकांवर स्थिरावला. व्यवहाराच्या दरम्यान निफ्टी २३ हजारांची पातळीही मोडणार अशी शक्यता निर्माण झाली होती. 

 

अमेरिकेत बेरोजगारीचे प्रमाण कमी झाल्यानं व्याजदर कपातीची शक्यता कमी झाली. कच्चा तेलाचे वाढलेले दर, डॉलरच्या तुलनेत घसरत असलेला रुपया, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून होणारी विक्री यामुळे शेअर बाजारांना फटका बसला. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका, धातू, वाहन, औषध निर्मिती, बांधकाम यासारख्या जवळपास सगळ्याच क्षेत्रातले समभाग आज घसरले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.