शेअर बाजारात मोठी घसरण

अमेरिकेकडून वारंवार दिली जाणारी आयात शुल्क वाढीची भिती,  कमकुवत होणारा रुपया यासारख्या कारणांमुळं देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. 

दिवसअखेर सेन्सेक्स १ हजार ६६ अंकांनी घसरुन ८३ हजारांच्या खाली जाऊन ८२ हजार १८० अंकांवर बंद झाला. व्यवहारा दरम्यान हा निर्देशांक ८२ हजारांच्या पातळीखाली जाण्याचीही भिती निर्माण झाली होती. निफ्टी ३५३ अंकांची घट नोंदवून २५ हजार २३२ अंकांवर स्थिरावला. जागतिक बाजारपेठेतली घसरण, मोठ्या कंपन्यांच्या समभागांच्या घसरलेल्या किंमती यामुळंही बाजारात घसरण दिसून आली.  

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.