अमेरिकेकडून पुन्हा अतिरीक्त आयात शुल्क लादले जाईल, या भीतीनं देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार घसरण झाली. दिवसअखेर सेन्सेक्स ७८० अंकांनी घसरुन ८४ हजार १८१ अंकांवर बंद झाला.
निफ्टी २६४ अंकांची घसरण नोंदवून २६ हजारांच्या खाली जाऊन २५ हजार ८७७ अंकांवर स्थिरावला. धातू, तेल आणि नैसर्गिक वायू यासारख्या क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले.