गणेश चतुर्थीच्या सुट्टीनंतर आज मुंबई शेअर बाजार उघडताच निर्देशांकांमध्ये मोठी घसरण दिसून आली. अमेरिकेनं भारतीय वस्तूंवर आयातशुल्क लावल्यामुळे बाजारावर परिणाम झाल्याचं चित्र आहे.
बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये ६२४ अंकांची तर निफ्टीमध्ये १८३ अंकांची घसरण झाली. दुपारी निर्देशांक थोडे सावरले. आज विशेषकरून माहिती तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता आणि औषधनिर्माण क्षेत्रांतले समभाग मंदीच्या प्रभावाखाली असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र ग्राहकोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रात खरेदीचं वातावरण आहे.