भारतीय शेअर बाजारात मोठी परकीय गुंतवणूक

११ जुलैला संपलेल्या आठवड्यात भारतीय रोखे बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी अंदाजे चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्यात रोख्यांच्या खरेदीमुळे त्यात भर पडली. अमेरिकेच्या निर्यात शुल्क धोरणामुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चिततेचे वातावरण असूनही भारतीय शेअर बाजारात मोठी परकीय गुंतवणूक झाल्याचे दिसून येत आहे.