May 19, 2025 11:31 AM | share market

printer

शेअर बाजारात आतापर्यंत 18 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय गुंतवणूक

मे महिन्यात भारतीय शेअर बाजारात आतापर्यंत 18 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय गुंतवणूक झाली आहे. जागतिक बाजारातलं सकारात्मक वातावरण आणि देशांतर्गत परिस्थितीत झालेली सुधारणा यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 18 हजार 620 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यावर भर दिल्यानंतर एप्रिल महिन्यात पुन्हा गुंतवणुकीचा ओघ वाढण्यास सुरुवात झाली.