मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज १ हजार २८२ अंकाची म्हणजेच सुमारे दीड टक्क्यांची घसरण नोंदवत ८१ हजार १४८ अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील ३४६ अंकांनी घसरून २४ हजार ५७८ अंकावर बंद झाला. मात्र मुंबई शेअर बाजारात एकंदर सकारात्मक चित्र दिसून आलं. आज २ हजार ५५९ कंपन्यांचे शेअर्स वधारले. १ हजार ४०२ कंपन्यांचे शेअर्स घसरले आणि १४० कंपन्यांचे शेअर्स कायम राहिले. राष्ट्रीय शेअर बाजारात ४३ कंपन्यांनी ५२ आठवड्यांचा उच्चांक , तर १० कंपन्यांनी ५२ आठवड्यांचा नीचांक गाठला.
Site Admin | May 13, 2025 7:29 PM | Mumbai Share Market | Nifty | Sensex
मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे १ हजार २८२ अंकाची घसरण
