शेअर बाजारात तेजी, निफ्टी पुन्हा २५ हजाराच्या वर

भारतीय शेअर बाजारांमध्ये आज तेजी पाहायला मिळाली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनं २५ हजाराचा टप्पा पुन्हा ओलांडला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज ६१२ अंकांची वाढ  झाली आणि तो ८१ हजार ६९८ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी १८७ अंकांची वाढ नोंदवत २५  हजार ११ अंकांवर बंद झाला.