डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 9, 2025 7:03 PM | share market

printer

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे ८८० अंकाची घसरण

भारत आणि पाकिस्तानधल्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवर झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज ८८० अंकाची घसरण झाली, आणि तो ७९  हजार  ४५४ अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २६६ अंकांची घसरण नोंदवत  २४ हजार ८ अंकांवर बंद झाला. 

 

स्टील, पोर्ट्स, सिमेंट या क्षेत्रांमध्ये आज घसरण झाली. दक्षिण कोरियाचा कॉस्पी, शांघाया एसएसई कॉम्पोझिट तसंच हाँगकाँगचा हँगसेंग हे आशियाई शेअर बाजारही आज घसरले. जपानच्या निक्कीमध्ये मात्र आज वाढ दिसून आली.