देशातल्या शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणात चढ उतार झाले. व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत होते. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्समध्ये साडे ४०० अंकांची वाढ झाली होती. मात्र त्यानंतर बाजारात मोठी घसरण झाली.
त्यानंतर चढ-उताराचा खेळ सुरू राहिला. दिवसअखेर अखेर सेन्सेक्स ११२ अंकांनी घसरुन ७३ हजार ८६ अंकांवर बंद झाला. निफ्टी ५ अंकांची घट नोंदवून २२ हजार ११९ वर बंद झाला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्सनं ७३ हजारांची पातळी मोडली होती तर निफ्टी २२ हजारांच्या खाली जाण्याच्या उंबरठ्यावर होता.