जीएसटी परिषदेच्या बैठकीला राज्याचे अर्थमंत्री गैरहजर राहतात – शरद पवार

जीएसटी परिषदेच्या बैठकीत राज्याचे अर्थमंत्री उपस्थित राहत नसल्याबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बारामतीमध्ये काल ते व्यापाऱ्यांना संबोधित करत होते. जीएसटी परिषदेच्या बैठकीला राज्याचे अर्थमंत्री सातत्याने गैरहजर राहतात. त्यामुळं राज्याची भूमिका मांडली जात नाही. केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे जीएसटीच्या संदर्भात समस्या घेऊन गेल्यावर त्यांनीही हेच सांगितल्याचं पवार म्हणाले. महाविकास आघाडीत सत्तेत आल्यावर जीएसटीचा प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडू असं आश्वासन त्यांनी दिलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.