पुण्यात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधे एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसशी युतीची बोलणी फिसकटल्यानंतर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधे आघाडीचे प्रयत्न सुरू असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शऱदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी सांगितलं. या आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीलाही सामावून घेण्याची आपल्या पक्षाची तयारी असल्याचं काकडे यांनी सांगितल्याचं हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटलं आहे. 

आज पहाटेपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे महानगरपालिका निवडणूक लढवण्याबद्दल चर्चा झाली. वंचित बहुजन आघाडी देखील या आघाडीत सहभागी होण्यास तयार असून त्यांच्याकडून ४० जागांची यादी आमच्याकडे देण्यात आली आहे, असं काकडे यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांच्या मनसेला देखील सामावून घेण्याची आपली तयारी आहे. मात्र, त्यांना देण्यात येणाऱ्या जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाट्याला आलेल्या जागांमधून दिल्या जातील, असंही त्यांनी  स्पष्ट केले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.