डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 7, 2024 3:31 PM | Sharad Pawar

printer

शरद पवार आज विदर्भाच्या दौऱ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रमुख, खासदार शरद पवार आज विदर्भाच्या दौऱ्यावर असून, आज ते पूर्व नागपूर, गोंदिया जिल्ह्यात तिरोडा आणि काटोल विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारसभांना संबोधित करतील. आज नागपूर इथं आगमन झाल्यावर त्यांनी नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांच्या प्रचार सभेला संबोधित केलं. महाराष्ट्रातून उद्योगांचं पलायन झालं असून देशाचे प्रधानमंत्री हे एका राज्याचे, नसून ते सर्व देशाचे असायला हवेत. जातीनिहाय जनगणनेची मागणी आम्ही तीन वर्षापासून करत असून, त्या माहितीच्या आधारावर आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची स्थिती निर्माण होऊ शकते, असं ते म्हणाले.

 

गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रविकांत बोपचे यांच्या प्रचार सभेला, आणि त्यानंतर संध्याकाळी काटोल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सलील देशमुख यांच्या सभेला शरद पवार उपस्थित राहतील.