डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मराठा-ओबीसी आरक्षणावरून तणाव निवळण्यासाठी पुढाकार घेण्याचं भुजबळांचं शरद पवारांना आवाहन

मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यात तयार झालेला तणाव निवळण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती आपण त्यांना केल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी काल भेट घेतल्यानंतर भुजबळ पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. यामध्ये कोणतंही राजकारण न आणता येत्या दोन दिवसांत आपण या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करू, तसंच राज्यातल्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून हा प्रश्न कसा सोडवता येईल ते पाहू, असं पवार यांनी म्हटल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.