जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून आज ते नागपूर इथे पूर्व नागपूर मतदारसंघाचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांच्या प्रचारसभेत सहभागी झाले. राज्यातल्या जनतेला परिवर्तन हवं आहे, याची आम्हाला जाणीव असून, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असं ते यावेळी म्हणाले.

 

महाराष्ट्रातून उद्योगांचं पलायन झालं असून देशाचे प्रधानमंत्री हे एका राज्याचे, नसून ते सर्व देशाचे असायला हवेत, असं ते यावेळी म्हणाले, आणि मतदारांना महाविकास आघाडीच्या पाच गॅरंटीची माहिती दिली.

 

जातीनिहाय जनगणनेची मागणी आम्ही तीन वर्षापासून करत असून, त्या माहितीच्या आधारावर आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची स्थिती निर्माण होऊ शकते, असं पवार या सभेत म्हणाले. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.