November 10, 2024 6:42 PM | Sharad Pawar

printer

मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली – शरद पवार

लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदारांनी स्पष्ट कौल न दिल्यानं मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी लाडकी बहीण सारखी योजना आणली, असं मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केलं. ते आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. भाजपाच्या नेतृत्वाखालचं सरकार संविधानाला धक्का पोहोचवेल अशी भिती लोकसभा निवडणुकीवेळी मतदारांमध्ये होती, ती अजूनही संपलेली नाही, त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीतही दिसून येईल, असंही पवार म्हणाले.

 

धाराशिव जिल्ह्यातल्या भूम परांडा विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांनी प्रचारसभा घेतली. आपल्या पक्षातल्या काही लोकांनी भाजपाला साथ दिली. केंद्रीय संस्थाच्या भीतीनं आपण भाजपासोबत गेल्याचं छगन भुजबळ यांनी कबूल केल्याचं पवार म्हणाले. ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे, त्यासाठी तुमची साथ हवी आहे, असं आवाहन पवार यांनी मतदारांना केलं. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.