सत्तेसाठी भाजपासोबत जाणाऱ्यांचा विचार न करता नेतृत्वाची नवी फळी तयार करु, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज पिंपरी चिंचवड इथं पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते. कुणाशीही संबंध ठेवू, पण भाजपाशी संबंधित असलेले लोक काँग्रेसच्या विचारांचे असू शकत नाहीत. त्यामुळे अशा संधीसाधूपणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही”, असं ते म्हणाले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत आपण सगळ्या जागा लढवू, आपल्या सोबत जो कोणी, महिला, तरुण येत असेल त्यांचं स्वागत आहे. आपण त्यांना संधी देऊ, या नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून विकासाचं काम करुया, त्यासाठी तयारीला लागा, असं आवाहन यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं.