देशाचे माजी गृहमंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. नांदेडमध्ये धनेगाव इथल्या शंकरराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, आमदार श्रीजया चव्हाण यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.
शंकरराव चव्हाण जयंतीनिमित्त नांदेडमध्ये आज विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. यानिमित्त देण्यात येणाऱ्या कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कारांचं वितरण आज राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातल्या भरीव योगदानासाठी जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.