शक्ती चक्रीवादळाचं केंद्र गुजरातच्या द्वारकेहून सुमारे ३४० किलोमीटर पश्चिमेकडे असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. पश्चिमेकडून नैऋत्येकडे पुढे सरकत या चक्रीवादळाची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हे चक्रीवादळ उद्यापर्यंत उत्तरेकडच्या मध्यवर्ती भागांपर्यंत आणि त्याला लागून असलेल्या अरबी समुद्राच्या मध्यापर्यंत पोहोचेल. सोमवारी ते पुन्हा फिरून पूर्व-इशान्येकडे सरकणार आहे.