नवरात्र महोत्सवासाठी राज्यातील शक्तीपीठांची मंदिरं सज्ज झाली आहेत. उद्यापासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभतेनं दर्शन घेता यावं यासाठीची सर्व व्यवस्था देवस्थान समिती आणि महापालिकेनं केली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काल मंदिर परिसराला भेट देऊन उत्सवाच्या तयारीची पाहणी केली. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. इतर गावांमधून येणाऱ्या भाविकांसाठी वाहनतळ, स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून वाहन तळापासून मंदिर परिसरात जाण्यासाठी सार्वजिक वाहतूक व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे.
Site Admin | September 21, 2025 9:04 AM | navratrotsav
शारदीय नवरात्रोत्सवासाठी राज्यातली शक्तीपीठं सज्ज
