डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

शक्ती अभियानाला सुरुवात

इंदिरा गांधी फेलोशिप अंतर्गत राज्यात आजपासून शक्ती अभियानाला सुरुवात झाली असून महिला सशक्तीकरण हे याचं उद्दिष्ट असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. मुंबई मध्ये टिळक भवन इथं या अभियानाला सुरुवात केल्यानंतर पटोले वार्ताहरांशी बोलत होते.

 

हे अभियान जिल्हा, तालुकास्तरावर राबवण्यात येणार असून महिला नेतृत्व पुढं आणणं याचा हेतू आहे, असं पटोले म्हणाले.
राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीविषयी बोलताना पटोले म्हणाले की विधानसभा निवडणुकीत चांगले निकाल दिसतील. महायुती सरकार बदलण्याचा जनतेचा विचार आहे, असंही पटोले म्हणाले

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.