देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रौत्सवाची सुरुवात आज घटस्थापनेने झाली. तत्पूर्वी आज पहाटे देवीची मंचकी निद्रा संपून तिची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. या महोत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणातले लाखो भाविक तुळजापुरात दाखल होत आहेत.
या काळात देवीच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या फुलांचं निर्माल्य मोठ्या प्रमाणात जमा होतं. या निर्माल्यापासून सेंद्रीय अगरबत्ती तयार करण्याचा उपक्रम मंदिर संस्थानने सुरू केला आहे. याबद्दल जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून