सुप्रसिद्ध मल्ल्याळी चित्रपट दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शक शाजी एन करुण यांचं काल तिरुवनंतपुरम इथं वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते.
मल्याळम सिनेमा जागतिक स्तरावर नेण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या पहिल्याच पिरावी या चित्रपटाला ७० हून अधिक आंतरराष्ट्रीय महोत्सवात प्रेक्षकांची दाद मिळाली होती. त्यांच्या स्वहम, वानप्रस्थाश्रम, या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.