छत्तीसगडमधे विजापूर जिल्ह्यात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत १२ माओवादी मारले गेले. यात जिल्हा राखीव सुरक्षा रक्षक दलाचे दोन जवान शहीद झाले, तर एक जवान गंभीररित्या जखमी झाला. या मोहिमेत दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्यातले केंद्रिय राखीव पोलीस दल, विशेष कडती दल, आणि कोब्रा युनिटचे जवानही सहभागी झाले होते. दंतेवाडा – बिजापूर सीमेवर हे माओवादी असल्याची खबर मिळाल्यावर या सर्वांनी तिथं संयुक्त शोध मोहीम सुरु केली होती. या मोहिमेदरम्यान आज सकाळी ही चकमक सुरु झाली. देन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरु आहे. आतापर्यंत १२ माओवाद्यांचे मृतदेह, तसंच काही रायफल्स आणि स्फोटक साधनसामुग्रीही सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं.
सुरक्षा दलांनी अतिरिक्त मनुष्यबळ त्या ठिकाणी पाठवलं असून शोधमोहीम सुरुच आहे.