धाराशिव-तुळजापूर रेल्वेमार्गाचं सात किलोमीटरचं पायाभूत काम पूर्ण

धाराशिव-तुळजापूर रेल्वेमार्गाचं सात किलोमीटरचं पायाभूत काम पूर्ण झालं आहे. कामाचा वेग असाच कायम राहिल्यास, आपण ठरवलेल्या उद्दिष्टानुसार पुढील २४ महिन्यांच्या आत कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्रापर्यंत रेल्वेमार्गाचं काम नक्की पूर्ण होईल, असा विश्वास, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.