डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

चेंबूर आग दुर्घटनेत सात मृत, राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत

मुंबईत चेंबूर इथं सिद्धार्थ कॉलनी परिसरात आज पहाटे एका दुमजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातल्या सात जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य दोन जण गंभीररीत्या होरपळले आहेत. इमारतीच्या तळमजल्यावर विजेच्या तारांजवळ शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचं अग्निशमन दल अधिकाऱ्यांनी सांगितलं.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि प्रशासकीय अधिकाऱ्याकडून घटनेची माहिती घेतली. दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसहाय्य तसेच दोन जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करेल असं त्यांनी जाहीर केलं. या घटनेची उच्च स्तरीय चौकशी केली जाणार असून पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी काळजी घेतली जाईल, असे ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.