डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 21, 2025 3:34 PM | Seva Parv | UPI Payment

printer

SevaParv: यूपीआय क्रांती घडवून आणल्यामुळे डिजिटल व्यवहारात वाढ

सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार देशाच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारने देशात यूपीआय क्रांती घडवून आणल्यामुळे डिजिटल व्यवहारात वाढ झाली आहे. यामुळे डिजिटल पेमेंट करणं सोपं आणि सुरक्षित झालं आहे. याविषयी अधिक माहिती…

 

केंद्र सरकारने गेल्या दशकभरात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक बदल घडवून आणले. यूनिफाईट पेमेंट सिस्टम म्हणजेच यूपीआय हा या बदलातला महत्त्वपूर्ण भाग आहे. २०१६ ला देशात यूपीआय सुविधा सुरू झाली. विविध बँक खाती एकाच ऍप्लिकेशनमधे एकत्रित आल्यामुळे पेमेंट करणं सुलभ झालं.

 

गेल्या नऊ वर्षांत यूपीआयचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. ऑगस्ट २०२५ मधे यूपीआयद्वारे २० अब्ज रुपयांपेक्षा जास्त पैशांचा व्यवहार झाल्याची नोंद आहे. यूपीआयमुळे मोठ्या व्यापाऱ्यांपासून छोट्या विक्रेत्यांपर्यंत सगळ्यांनाच फायदा झाला आहे.

 

यूपीआयचा विस्तार आता देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवरही झाला आहे. संयुक्त अरब अमिराती, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, मॉरिशस, फ्रान्स यांसारख्या देशातही आता यूपीआयचा वापर होत आहे. कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्यात आणि आर्थिक समावेशनाला चालना देण्यात यूपीआयनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.