सेवा पर्व या विशेष मालिकेत आपण सरकारच्या विविध क्षेत्रातील कामगिरीविषयी जाणून घेत असतो. सुरक्षा दलांनी राबवलेल्या नक्षलविरोधी मोहिमेबद्दल जाणून घ्या…
केंद्र सरकारने नक्षलविरोधी कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गेल्या अकरा वर्षात सुरक्षा दलांनी नक्षलींविरोधात शून्य सहिष्णुता धोरणाचा अवलंब केला आहे. नक्षलग्रस्त जिल्ह्यांमधे सरकारी योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. जे प्रदेश नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जात असत ते आता हरित विकासाचे प्रदेश झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात म्हटलं.
नक्षलवाद्यांविरोधात कठोर कारवाई आणि विकासाचा अनुशेष भरून काढत सरकार नक्षलवादाविरोधातली लढाई लढत आहे. नक्षलग्रस्त भागात विकास करण्यासाठी अर्थसंकल्पातील तरतूद तीनशे पटीने वाढवण्य़ात आली आहे. त्यामुळे आधीच्या तुलनेत नक्षली हिंसेचं प्रमाण ५३ टक्क्यानी कमी झालं आहे. पुढल्या वर्षी ३१ मार्चपर्यंत देशातली नक्षलवादी चळवळ पूर्णपणे संपुष्टात आणण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं आहे.