सेवा आणि सुशासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार परिवर्तन आणि प्रगतीसाठी अथक परिश्रम घेत आहे. आजच्या सेवा पर्वमध्ये जाणून घेऊया भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरच्या सक्षमतेविषयी….
जागतिक घडामोडींमध्ये प्रभावशाली राष्ट्र म्हणून आज भारत उदयाला येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा जागतिक पातळीवर सहभाग वाढला आहे. ग्लोबल साऊथबरोबरच्या सौहार्दपूर्ण संबंधांतून भारताचा जागतिक प्रश्नांबाबत सक्रिय सहभाग दिसून आला आहे आणि कोरोना काळात लसपुरवठ्याच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. राष्ट्रीय हितसंबंध आणि धोरणात्मक स्वायत्ततेचा सिद्धांत हे भारताच्या बहुपक्षीय सहभागाच्या केंद्रस्थानी आहेत. ब्रिक्स, क्वाड, शांघाय सहकार्य संघटना अशा मंचांवरचा भारताचा सहभाग हा याच धोरणांचं संतुलन दर्शवतो. विविध राष्ट्रांना भेडसावणाऱ्या राष्ट्रीय तसंच सागरी सुरक्षा, तंत्रज्ञान सहकार्य, दहशतवाद अशा विविध मुद्द्यांवर घेतलेल्या ठाम भूमिकांमुळे भारताची जागतिक पातळीवरची प्रतिमा उंचावली आहे.