सेवा आणि सुशासन या मंत्राच्या आधारे वाटचाल करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. सेवा पर्वच्या या विशेष मालिकेअंतर्गत आज अंतराळ क्षेत्राला अभूतपूर्व उंचीवर नेण्यासाठी केलेले प्रयत्न आज जाणून घेऊया…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अंतराळ क्षेत्रात एकामागून एक टप्पे गाठले आहेत. हाफ-क्रायोजेनिक इंजिन आणि इलेक्ट्रिक प्रोपल्शनमुळे अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती झाली आहे. भारताने काही काळापूर्वी अंतराळात डॉकिंग अर्थात उपग्रह जोडणी आणि अनडॉकिंग म्हणजेच उपग्रहांचं विलगीकरण यशस्वीरित्या पूर्ण केलं. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचा अंतराळातला यशस्वी प्रवास हे भारताच्या पहिल्या मानवसहित अंतराळ मोहिमेच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल आहे. २०३५पर्यंत अंतराळस्थानक उभारण्याचीही योजना आहे. पायाभूत सुविधा नियोजनात उपग्रह-आधारित कृषी क्षेत्राला साहाय्य करणं, मच्छिमारांची सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन अशा क्षेत्रात भारताने प्रगतीचे नवे टप्पे गाठले आहेत.