सेवा आणि सुशासन या मंत्राच्या आधारे वाटचाल करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. सेवा पर्वच्या या विशेष मालिकेअंतर्गत आज केंद्र सरकारनं इंटरनेट क्रांतीच्या माध्यमातून संपर्क जोडणीच्या साधनांमध्ये घडवून आणलेल्या परिवर्तनाविषयी जाणून घेऊया…
ब्रॉडबँड सुविधेची व्यापक उपलब्धता आणि भविष्याच्या अनुषंगाने मोबाईल सेवेच्या वेगाने विस्तारत असलेल्या जाळ्यामुळे संपूर्ण भारतात एक परिवर्तन घडून येत आहे. भारतनेट हा प्रकल्प या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहे. या प्रकल्पाअंतर्गत, सुमारे 7 लाख किलोमीटर ऑप्टिकल फायबर केबलच्या माध्यमातून, 2.18 लाख पेक्षा जास्त ग्रामपंचायतींपर्यंतचा एक डिजिटल महामार्ग रचला गेला आहे. यामुळे अत्यंत दुर्गम ठिकाणी ई-प्रशासन, शिक्षण आणि लघु-उद्योगांसाठी संधींची दारं खुली होऊ लागली आहेत. कधीकाळी गावांमध्ये शहरांपेक्षा जास्त इंटरनेट वापरकर्ते असण्याची कल्पनाही करता येत नव्हती पण आज हीच बाब प्रत्यक्षात उतरली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतानं जगातील सर्वात परवडणाऱ्या दरात मोबाईल डेटा उपलब्ध करून देणाऱ्या देशांमध्ये आपलं स्थान निर्माण केलंय. आज 2014 च्या तुलनेत इंटरनेट डेटाच्या किमतीत जवळजवळ 97 टक्क्याची घट झाली आहे.
या बदलांसोबतच 5G तंत्रज्ञानात झालेली क्रांतीनं नागरिकांसाठी आरोग्य विषयक सल्लामसलत सुविधा, शेतकऱ्यांसाठी पीक सल्ला आणि आता आजवर वंचित राहावं लागलेल्या बाजारपेठांपर्यंत वेगाने पोहता येण्यासारख्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली भारतात घडून येत असलेली ही इंटरनेट क्रांती संधी, सन्मान आणि भविष्याची आशा असलेल्या डिजिटल भारताला घरोघरी पोहचवत आहे.