देशातल्या तरुणांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक धोरणं आखली आहेत. आजच्या सेवा पर्व या विशेष मालिकेत जाणून घेऊ या संरक्षण उत्पादन क्षेत्राविषयी….
संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर होणं याला केंद्र सरकारचं प्राधान्य आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेचं प्रत्यंतर आलं. सन २०२४-२५ मधे वार्षिक संरक्षण उत्पादन एक लाख ५० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं. धोरणात्मक बदल, व्यवसायात आलेली सुलभता, आणि स्वदेशीवर दिलेला भर यामुळे खासगी आणि सरकारी संरक्षण उत्पादन क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. मेक इन इंडिया हे धोरण देशाच्या संरक्षणासाठी महत्त्वाचं ठरलं असून पाकिस्तानविरुद्धच्या ऑपरशेन सिंदूरमधे याचा फायदा झाला. संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेमुळे निर्यातीत वाढ झाली असून संरक्षण क्षेत्रात भारत जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवत आहे.