डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 23, 2025 1:24 PM | SevaParv

printer

SevaParv: प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेबद्दल….

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सेवा आणि सुशासनाचा मंत्र घेऊन सरकार परिवर्तन आणि विकासाच्या दिशेनं काम करत आहे. सेवा पर्व या विशेष मालिकेत आज जाणून घेऊ या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेबद्दल….

 

देशातल्या युवांना कुशल बनवण्यासाठी अकरा वर्षांपूर्वी केंद्र सरकारने स्कील इंडिया योजना सुरू केली. याच योजनेचा भाग म्हणून १५ जुलै २०१५ ला प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सुरू करण्यात आली. या योजने अंतर्गत गेल्या दहा वर्षात देशातल्या हजारो युवकांनी विविध क्षेत्रातलं कौशल्य आत्मसात केलं आहे. 

 

 

या योजनेअंतर्गत गेल्या दहा वर्षात एक कोटी  ६३लाख युवांना प्रशिक्षित करण्यात आलं आहे. यात ४५ टक्के वाटा महिलांचा आहे. आता योजनेचा चौथा टप्पा सुरू झाला असून पुढील वर्षभर तो राबवला जाईल. या योजनेचा लाभ घेऊन कुशल झालेल्या युवांना नोकरी तर मिळत आहेच, शिवाय स्वतःचा व्यवसायही उभारायला मदत मिळत आहे.