प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सेवा आणि सुशासनाचा मंत्र घेऊन सरकार परिवर्तन आणि विकासाच्या दिशेनं काम करत आहे. सेवा पर्व या विशेष मालिकेत आज जाणून घेऊ या गृहनिर्माण आणि शहर विकासात सरकारनं केलेल्या कामाबद्दल…
देशात मेट्रो आता हे फक्त वाहतुकीचं साधन राहिलं नसून देशाच्या विकासाच्या केंद्रस्थानी असलेली जीवनवाहिनी झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जगातली तिसरी सर्वात मोठं मेट्रो जोडणी भारतात उभी राहिली आहे आणि शहरी दळणवळण क्षेत्रात यामुळे मोठे सकारात्मक बदल दिसून येत आहेत. काहीच दिवसांपूर्वी कोलकाता इथं मेट्रो रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन करताना, २०१४ पासून झालेल्या मेट्रोच्या प्रगतीचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला होता.
तसंच शहरी भागाचं जीवनमान उंचावण्यासाठी सर्वांना चांगलं घर उपलब्ध करून द्यायलाही गेल्या ११ वर्षांत सरकारनं प्राधान्य दिलं आहे. मेट्रो सुविधा उपलब्ध करून देण्यापासून ते नागरिकांना परवडणारी घरं उपलब्ध करून देण्यापर्यंत शहरी भागातल्या नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे.