सेवापर्व या विशेष मालिकेत आपण सरकारच्या विविध क्षेत्रातील कामगिरीविषयी जाणून घेत असतो. आज आपण जाणून घेणार आहोत देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातल्या वचनबद्धतेविषयी….
भारताची प्रतिमा आज जागतिक स्तरावर एक सशक्त, आत्मनिर्भर देश म्हणून झाली आहे. ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेत म्हणाले होते.
पहलगाम हल्ल्याला प्रत्यूत्तर देण्यासाठी भारतानं ६ आणि ७ मे ला ऑपरेशन सिंदूर राबवलं. यात पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारतीय लष्कराचं सामर्थ्य आणि तंत्रज्ञानाची क्षमता दिसून आली. हवाई संरक्षण यंत्रणा आणि ब्राह्मोस क्षेपणास्त्रानं तसंच ड्रोननं ऑपरेशन सिंदूरमधे सर्वोत्तम कामगिरी केली. ऑपरेशन सिंदूरमधून भारताचं लष्करी सामर्थ्यच नव्हे तर तंत्रज्ञानाची शक्ती आणि न्यायाचं नवं रुपही दिसलं. ऑपरेशन सिंदूर अजून संपलं नाही, पाकिस्तानने कोणतीही आगळीक केली तर भारत चोख प्रत्यूत्तर देईल, असा इशारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देऊन ठेवला आहे.