सेवा आणि सुशासन, हे सूत्र समोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारन गेल्या 11 वर्षात अनेक क्षेत्रात सुधारणा घडवून आणल्या आहेत. सेवा पर्वच्या आजच्या भागामध्ये, ऐकुयात केंद्र सरकारनं शहरी जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेल्या सुधारणांबद्दल …..
भारतामध्ये मेट्रो रेल्वे आता फक्त एक परिवहन साधन नसून ती देशाच्या वाढ आणि विकासाच्या अध्यायातली एक जीवनरेखा बनली आहे. शहरी परिवहन विस्तारामध्ये मेट्रो जलद प्रगतीचे प्रतिबिंब असून मेट्रो सेवा महत्त्वाकांक्षा, नाविन्य आणि शाश्वत शहरी जीवनाच्या दृष्टिकोनान चालविली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात, भारत आता जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मेट्रो रेल्वेच जाळे असणारा देश ठरला आहे.
मेट्रो सुविधांपासून ते लोकांना घर देण्यापर्यंत, सरकार शहरी भागात जीवनाच्या दर्जात सुधारणा करत असून शहरी जीवन सुलभतेच्या दृष्टीकोनाची पूर्तता करीत आहे.