डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

गोर-बंजारा समाजाचं आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती

गोर-बंजारा समाजाचं आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना अभिवादन केलं. श्री सेवालाल महाराज यांचे विचार न्यायप्रिय, सौहार्दपूर्ण आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून समाजाला सदैव मार्गदर्शन करत राहतील, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. 

 

श्री सेवालाल महाराज यांची जयंती आज महाराष्ट्रात वाशिममध्ये  मानोरा इथं पोहरादेवी या सेवालाल महाराज यांच्या समाधीस्थळी उत्साहात साजरी करण्यात आली. इथं पालखी सोहळा, शोभा यात्रेसह अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं होत. 

 

राज्यात इतर अनेक जिल्ह्यांत श्री सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा