September 17, 2025 8:05 PM | Seva Parv Programs

printer

सेवापर्वावर आधारित दूरदर्शनसाठी विशेष कार्यक्रमांची मालिका

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात सेवापर्वावर आधारित दूरदर्शनसाठी विशेष कार्यक्रमांची मालिका सुरू केली. यात तीन माहितीपट आणि एका विशेष कार्यक्रमाचा समावेश आहे. संकल्प की शक्ती, सुशासन का सामर्थ्य, विश्वपटल पर नेतृत्व का शंखनाद आणि कर्मयोगी – एक अंतहीन यात्रा अशी या माहितीपटांची नावं आहेत. याव्यतिरिक्त, प्रादेशिक भाषांमधले अनेक माहितीपट देखील तयार केले गेले असून ते दूरदर्शनच्या प्रादेशिक केंद्रांद्वारे प्रसारित केले जातील, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.