सेवा आणि सुशासन या मार्गदर्शक तत्वांनुसार वाटचाल करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सतत कार्यरत आहे. सेवा पर्व या मालिकेत आज आपण स्मरण करणार आहोत देशाच्या अजरामर वारसा आणि आदर्शांचं….
(थोर स्वातंत्र्य सेनानी, तत्वचिंतक आणि परंपरेच्या रक्षकांनी केलेल्या बलिदान आणि योगदानातून राष्ट्राची उभारणी होते. अशा थोर व्यक्तिमत्वांच्या सन्मानासाठी केंद्र सरकारने अनेक पावलं उचलली. त्यांच्या इतिहासाशी संबंधित अनेक वास्तूंचा जीर्णोद्धार झाला. तर अनेक नवीन वास्तू बांधण्यात आल्या. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रधानमंत्र्यांनी या प्रतीकांचं महत्त्व समजावून सांगितलं….
दिल्लीतलं युद्ध स्मारक, अमृतसरच्या जालियनवाला बागेतलं स्मारक, तीनमूर्ती भवनात सुरु केलेलं प्रधानमंत्री संग्रहालय यांचा त्यात समावेश आहे. राष्ट्रीय पोलीस स्मारक, आदिवासी स्वातंत्र्यलढ्यातल्या सेनानींचं संग्रहालय या वास्तू त्यात्या क्षेत्रातला इतिहास सांगतात.)