सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या सर्व समावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. सरकारने शेतीला तंत्रज्ञानाची जोड देत शेतकऱ्यांच्या मेहनतीला नवा आयाम दिला आहे. याविषयी अधिक माहिती…
कृषी क्षेत्रात सरकारने सुरू केलेलं डिजिटल कृषी अभियान शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर अचूक परिणाम साधत आहे. उपग्रह, सेन्सर्स तसंच मोबाईल ॲप्लिकेशन यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीचं नियोजन, सिंचन पुरवठा आणि पीक संरक्षणाबाबत मार्गदर्शन मिळत आहे. ई-नाम या माध्यमातून देशभरातल्या एक हजारांहून अधिक बाजारपेठा जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासाठी योग्य मोबदला मिळत आहे. अॅग्री-स्टॅक अंतर्गत किसान ड्रोन आणि जिओ-टॅग केलेले पीक डेटा शेतकऱ्यांना मातीचं आरोग्य, हवामान आणि कीटक नियंत्रणाबद्दल रिअल टाईम माहिती पुरवत आहे.
नमो ड्रोन दीदी उपक्रमाद्वारे, ग्रामीण महिलांना ड्रोन चालवण्याचं, शेतात फवारणी करण्याचं, पिकांचे मॅपिंग करण्याचं आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे.