सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या सर्व समावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. देशातल्या महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने उचललेल्या पावलांविषयी अधिक माहिती…
गेल्या ११ वर्षांत केंद्र सरकारने सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात महिलांना सक्षम करण्यासाठी व्यापक धोरण आखलं आहे. नारीशक्ती या अभियानामुळे महिलांना सन्मान, सुरक्षा आणि स्वावलंबन प्रदान केलं आहे. हिंसाचार तसंच लिंगाधारित भेदभावापासून घटनात्मक संरक्षण ते परिवर्तनकारी योजनांपर्यंत महिलांच्या विकासासाठी केंद्र सरकारने विशेष प्रयत्न केले आहेत. बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेमुळे लिंग गुणोत्तरात लक्षणीय फरक दिसून आला आहे. जानेवारी २०१५मध्ये सुरू झालेल्या सुकन्या समृद्धी योजनेमुळे भारतातल्या अनेक तरुणींना सक्षमीकरणासाठी मदत मिळाली आहे. लखपती दीदी मोहिमेमुळे स्वयंसहायता गटांना दरवर्षी किमान एक लाख रुपये उत्पन्नाची हमी मिळाली आहे. या विविध योजनांमुळे तळागाळातल्या प्रशासन व्यवस्थेपासून ते संरक्षण दल, विमान वाहतुकीपर्यंत महिला आता सर्वच क्षेत्रात नेतृत्व करत आहेत.