सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या सर्व समावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे कृषी क्षेत्रात सुधारणा होत असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होत आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील कृषी क्षेत्राचं क्षितिज आणखी विस्तारत आहे. शेतीपूरक विविध उद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण कुटुंबांना उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होत असून त्यांचं भविष्य सुरक्षित होण्यासाठी हे कृषी आधारित उद्योग सहाय्यभूत ठरत आहेत. धान्य पिकांबरोबरच फळे, भाजीपाला, मसाले, दुध आणि दुग्धजन्य पदार्थ, मत्स्यउत्पादन, पशुपालन यासारख्या शेतीपूरक उद्योगांना केंद्र सरकारने दिलेलं पाठबळ शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.