सेवा पंधरवड्यांतर्गत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिल्लीसाठी १६०० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. गेल्या ११ वर्षांत प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित झाला आहे. अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे आणि गरिबांपर्यंत सुविधा पोहोचल्या आहेत, असं शहा म्हणाले.
समाजाचं हित साधण्याच्या उद्देशानं सुरु करण्यात आलेल्या सेवापर्व मध्ये देशातल्या सर्व नागरिकांनी उत्साही सहभाग घ्यावा, असं आवाहन केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी केलं. नड्डा यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जीवनप्रवास उलगडणाऱ्या प्रदर्शनाचं उदघाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येकानं दिवसातला किमान एक तास स्वच्छतेसाठी द्यावा असं आवाहन त्यांनी केलं.
विविध केंद्रीय मंत्र्यांनी स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेतला.