सेवा आणि सुशासन या तत्वांचं अनुसरण करीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रसरकारने अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या आहेत. हवामान बदल आणि पर्यावरण रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामगिरीचा थोडक्यात आढावा…
जागतिक स्तरावर भारताने नेहमीच पर्यावरण रक्षणाची भूमिका घेतली आहे. गेल्या ११ वर्षांत वनसंवर्धन, हवामानविषयक न्याय्य भूमिका, सौर आणि हरित ऊर्जा या विषयांचा पुरस्कार करत शाश्वत विकासाला भारताने पाठिंबा दिला आहे. पॅरिसमधे झालेल्या कॉप ट्वेंटीवन परिषदेत 2030 पर्यंत स्वच्छ उर्जा वापर ४० टक्के करण्याचं वचन भारताने दिलं आणि ते 2021मधेच पूर्ण केलं. गेल्या वर्षी अमेरिकेत प्रधानमंत्र्यांनी कार्बन उत्सर्जनाविषयी सांगितलं.