अहिल्यानगर जिल्ह्यात राहता इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत जिल्हास्तरीय सेवा पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सेवा पंधरवड्यात पाणंद इथले रस्ते अतिक्रमणमुक्त करणं, विविध कागदपत्रांचं वाटप, अनेक योजनांची अंमलबजावणी करणार असल्याचं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.
भंडारा जिल्ह्यातही नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियानाचा शुभारंभ झाला. या विशेष मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुका आणि गावपातळीवर नेत्र तपासणी शिबिरे घेण्यात येणार आहेत.