सेवा आणि सुशासन या मूल्यांच्या आधारवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकारचं कामकाज सुरू आहे. सेवा पर्व या विशेष मालिकेच्या अंतर्गत स्वच्छ भारत मोहिमेद्वारे प्रत्येक नागरिकाचं आयुष्य कसं बदललं हे जाणून घेऊया.
स्वच्छ भारत अभियानाला अकरा वर्षांपूर्वी सुरूवात झाली. १५ ऑगस्ट २०१४ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून याची घोषणा केली.
स्वच्छता अभियानाने देशात क्रांतीकारी बदल घड़वून आणले आहेत. उघड्यावर शौचास जाणं बंद झाल्याबाबत एका मासिकात अलिकडेच एक अहवाल प्रसिद्ध झाला. यामुळे साथीच्या आजाराला पायबंद घातला गेल्यामुळे वर्षभरात सत्तर हजार मृत्यू रोखण्यात यश आल्याचं कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि ओहयो विद्यापीठानं केलेल्या एका अहवालात स्पष्ट झालं आहे. यामुळे देशातल्या महिलांचं जीवनमान उंचावलं. चमोली जिल्ह्यातील महिलेनं याबाबत आपलं मनोगत व्यक्त केलं आहे.
देशभरात बारा कोटी घरांमधे शौचालय बांधण्यात आलं आहे. ७८ टक्के घरांना स्वच्छ पाणीपुरवठा केला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत शहरांना २०२६ पर्यंत कचरामुक्त करण्याचं उद्दिष्ट आहे. या उपक्रमात नागरिक उत्स्फूर्त सहभाग घेत असून भारताची प्रतिमा जगाच्या नकाशावर सुधारली आहे.