सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अनेक महाविद्यालयांनी राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषद अर्थात नॅकच्या मूल्यांकनाकडे सातत्यानं केलेल्या दुर्लक्षाची गंभीर दखल विद्यापीठ प्रशासनानं घेतली आहे. वारंवार सूचना देऊनही प्रतिसाद न देणाऱ्या ११६ महाविद्यालयांना नव्यानं होणाऱ्या बायनरी नॅक मूल्यांकन प्रक्रियेला सामोरे जाण्याच्या सूचना विद्यापीठानं दिल्या आहेत.
विद्यापीठाशी संलग्न होऊन पाच वर्षे अथवा त्याहून अधिक कालावधी उलटून ही एकदाही नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांना आणि मान्यताप्राप्त संस्थांना येत्या तीन महिन्यांत प्रस्ताव सादर करण्यास सांगितलं आहे.